जळगाव -जिल्ह्यातील भुसावळ शहरात एका 35 वर्षीय तरुणाचा अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी समोर आली असून, शहरात खळबळ उडाली आहे. संदीप गायकवाड (वय 35 वर्षे, रा. समतानगर ध्यान केंद्राजवळ, भुसावळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
भुसावळ शहरातील 40 खोली भागातील हनुमान मंदिराजवळ सोमवारी (दि. 12 एप्रिल) रात्री उशिरा ही घटना घडली आहे. मंगळवारी सकाळी 40 खोली भागात एका तरुणाचा मृतदेह पडला असल्याची माहिती भुसावळ शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळी पडलेल्या मृतदेहाची स्थिती पाहून हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने प्राथमिक तपासाला सुरुवात केल्यानंतर मृत व्यक्ती हा संदीप गायकवाड असल्याची माहिती समोर आली. या घटनेबाबत मृताच्या कुटुंबीयांना माहिती मिळाल्यानंतर ते देखील घटनास्थळी आले होते. मृत संदीप गायकवाड याच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि आई असा परिवार आहे. मृतदेह पाहून त्यांनी एकच हंबरडा फोडला होता.
श्वान पथक व फॉरेन्सिक टीम दाखल