यावल- जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. केवळ एक चपाती खायला दिली याचा राग मनात धरुन दोन चिमुकल्यांची हत्या करण्यात आली आहे. दोन चिमुकल्या चुलत भावांना विहिरीत धकलून एका तरुणाने त्यांचा जीव घेतला आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांनी सर्वांचे जबाब घेतले. चुलत भावाच्या जबाबात तफावत आढळल्याने पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. जेवणात एकच चपाती दिल्याच्या रागातून आपण हा गुन्हा केल्याचं आरोपीने कबुल केले आहे.
धक्कादायक... एकच चपाती दिल्याने चुलत भावांना विहिरीत ढकलले - jalgaon crime
निलेश सावळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रितेश रवींद्र सावळे (वय 6) आणि हितेश रवींद्र सावळे (वय 5) असे हत्या झालेल्या चिमुकल्या भावंडाची नावे आहे. तिघेही चांगले मित्र होते. आरोपी निलेश सावळे हा मृत रितेश आणि हितेश यांचा चुलत भाऊही आहे.
निलेश सावळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रितेश रवींद्र सावळे (वय 6) आणि हितेश रवींद्र सावळे (वय 5) असे हत्या झालेल्या चिमुकल्या भावंडाची नावे आहे. तिघेही चांगले मित्र होते. आरोपी निलेश सावळे हा मृत रितेश आणि हितेश यांचा चुलत भाऊही आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चिमुकल्यांनी आपल्याला नोकरासारखी वागणूक देत जेवणात एकच चपाती दिल्याच्या रागातून निलेश याने हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्याने दोघांना शेतातील विहिरीत ढकलून दिले होते. गुरुवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास दोन्ही मुलांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले आहेत.