महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात व्हॉट्सॲपवर 'भावपूर्ण श्रद्धांजली' असे स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या

जळगावात व्हॉट्सॲपवर 'भावपूर्ण श्रद्धांजली' असे स्टेटस ठेऊन तरुणांने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हा तरूण सैन्य भरतीची तयारी करत होता.

Youth commits suicide in Jalgaon
जळगावात व्हॉट्सॲपवर 'भावपूर्ण श्रद्धांजली' असे स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या

By

Published : Feb 17, 2021, 10:29 PM IST

जळगाव -जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथील लेलेनगर भागात राहणाऱ्या आकाश रविंद्र बावस्‍कर (वय २१) या तरुणाने राहत्या घरात छताला गळफास लावून आत्महत्या केली. गळफास घेण्यापूर्वी त्याने दुपारी सव्‍वाचारच्‍या सुमारास 'भावपूर्ण श्रद्धांजली' असे स्टेटस ठेवले आणि काही मिनिटातच त्याने घराच्या वरील मजल्यावर पत्र्याच्या शेडमध्ये छताला गळफास लावून स्वतःची जीवनयात्रा संपवली.

नातेवाईकांनी रुग्णालयात घेतली धाव-

घरातील लोकांनी त्याला छताला लटकलेल्या अवस्थेत पाहताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांनी आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावले. आकाश यास खाली उतरवून पहूर ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे यांनी तपासणी अंती त्यास मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच सरपंच शंकर जाधव, उपसरपंच राजू जाधव, माजी सरपंच लक्ष्मण गोरे, ग्रामपंचायत सदस्य सोनू बावस्कर, शिवाजी राऊत यांच्यासह गावातील पदाधिकारी, ग्रामस्थांसह नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.

आकाश सैन्य भरतीची करत होता तयारी-

आई- वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या आकाशच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांसाठी आकाशच फाटले. त्याचा मृतदेह पाहून त्याच्या आई- वडिलांनी एकच हंबरडा फोडला. मित्र परिवारामध्ये तो एक मनमिळावू स्वभावाचा मित्र म्हणून चांगलाच परिचित होता. मात्र, त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? हे मात्र समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई- वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत आकाश बारावीनंतर पोलीस भरती, सैन्य भरतीची तयारी करत होता.

ABOUT THE AUTHOR

...view details