जळगाव- पालकांनी महागडी दुचाकी घेऊन न दिल्याने रागाच्या भरात मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी उशिरा जळगावातील सिंधी कॉलनीत घडली आहे. कमल भीषणचंद तुलसी (वय 18, रा. सिंधी कॉलनी, जळगाव) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. आपली आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे महागडी दुचाकी कशी घेऊन देणार, महागड्या दुचाकीचा हट्ट करू नको, असे पालकांनी सांगितल्यानंतर कमलने टोकाचे पाऊल उचलले.
पालकांनी महागडी दुचाकी घेऊन न दिल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या - दुचाकीसाठी युवकाची आत्महत्या
काही दिवसांपासून कमल पालकांकडे सुमारे एक ते दीड लाखाची महागडी दुचाकी खरेदी करून द्यावी म्हणून हट्ट करीत होता. परंतु, लॉकडाऊन असल्यामुळे व्यवसायही ठप्प पडला. त्यात परिस्थितीही नाजूक, त्यामुळे महागडी दुचाकी घेऊ नको, असे पालकांनी कमलला सांगितले होते. याच गोष्टीचा राग त्याच्या डोक्यात होता
भीषणचंद जसूमल तुलसी हे मूळचे यावल तालुक्यातील फैजपूर येथील रहिवासी आहेत. वर्षभरापूर्वीच ते शहरातील सिंधी कॉलनी भागात कुटुंबासह राहण्यासाठी आले आहेत. शहरातील दीक्षितवाडीत त्यांचे स्पेअर पार्टचे दुकान आहे. हे दुकान मुलगा कमल सांभाळत होता. दरम्यान, काही दिवसांपासून कमल पालकांकडे सुमारे एक ते दीड लाखाची महागडी दुचाकी खरेदी करून द्यावी म्हणून हट्ट करीत होता. परंतु, लॉकडाऊन असल्यामुळे व्यवसायही ठप्प पडला. त्यात परिस्थितीही नाजूक, त्यामुळे महागडी दुचाकी घेऊ नको, असे पालकांनी कमलला सांगितले होते. याच गोष्टीचा राग त्याच्या डोक्यात होता.
आई-वडिलांना बाहेर पाठवून घेतला गळफास-
रविवारी सायंकाळी कमल याने आई-वडिलांना पायमोजे घेवून यावे, असे सांगितले. त्यामुळे पालक सिंधी कॉलनी स्टॉपजवळ मुलासाठी पायमोजे घेण्यासाठी गेले असता, कमल याने घरात कुणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. आई-वडील घरी येताच त्यांना मुलाने गळफास घेतल्याचे दिसताच हंबरडा फोडला. नंतर त्याला शेजारचांच्या मदतीने खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासणीअंती मृत घोषित केले. रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, कमल याच्या पश्चात आई-वडील व दोन विवाहित बहिणी आहेत.