जळगाव - पारोळा शहरात दिवाळीसाठी मामाकडे आलेल्या एका 20 वर्षांच्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणीला शिवीगाळ व मारहाण करत बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. संबंधित तरुणी गंभीर जखमी झाली होती. आज (१० ऑक्टोबर) प्रकृती खालवल्याले तिला धुळ्यातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणात तीन आरोपींसह एका महिलेचा समावेश आहे.
या घटनेसंदर्भात पीडित तरुणीच्या मामाने पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार तरुणीवर अत्याचार करणाऱ्या तिघा नराधमांसह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप रुग्णालय प्रशासनाचा शवविच्छेदन अहवाल प्रलंबित असल्याने तो आल्यानंतरच अनेक बाबी उघड होतील.
पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत अॅट्रॉसिटीचे कलम अंतर्भूत आहे. तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रविण मुंडे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल प्रलंबित असल्याने सामूहिक अत्याचाराबाबतची संदिग्धता कायम आहे. मात्र, पीडितेच्या नातेवाइकांनी याप्रकरणात सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप केलाय.
औषधं घेण्यासाठी गेली...आणि रुग्णालयात सापडली
या घटनेतील पीडित तरुणी ही पारोळा तालुक्यातील टोळी या गावातील रहिवासी होती. दिवाळी सणासाठी ती 3 नोव्हेंबर रोजी भावासह पारोळा येथे मामाच्या घरी आली होती. 7 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तरुणी औषधे घेण्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. मात्र, यानंतर रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. तरुणीच्या नातेवाईकांनी रात्रभर शोधाशोध करूनही तिचा शोध लागला नाही. म्हणून तिच्या मामाने 8 नोव्हेंबर रोजी सकाळी पारोळा पोलीस ठाण्यात भाची हरवल्याची तक्रार दाखल केली. याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता तिच्या मामाला एका तरुणीला विषबाधा झाली असून, तिच्यावर कुटीर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली. यानंतर मामाने रुग्णालयात जाऊन खात्री केल्यानंतर ती आपलीच भाची असल्याचे समजले. तरुणी बेशुद्धावस्थेत होती. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी धुळ्याला हलवण्याचा सल्ला दिला. यानंतर तिला तातडीने धुळ्यात हलवण्यात आले.
धुळ्यात अखेरचा श्वास