यावल ( जळगाव ) -कोरोनामुळे सातपुडा निवासिनी मनुदेवीचा बुधवारी (दि.१९) होणारा यात्रोत्सव रद्द झाला आहे. दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी हा यात्रोत्सव साजरा होतो. सध्या दमदार पाऊस झाल्याने निर्सगरम्य वातावरणात दर्शन घेण्यासाठी शेजारील राज्यातून हजारोंच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता होती. मात्र, कोरोनामुळे आधीच मंदिर बंद असल्याने यात्रोत्सव होणार नाही. तरीही खबरदारी म्हणून तेथे पोलीस बंदोबस्त तैनात आहे.
कोरोनामुळे मनुदेवीची पिठोरी अमावस्येची यात्रा अखेर रद्द - manudevi yatra
कोरोनामुळे सातपुडा निवासिनी मनुदेवीचा बुधवारी होणारा यात्रोत्सव रद्द झाला आहे. दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी हा यात्रोत्सव साजरा होतो.
यावल तालुक्यातील आडगाव-कसारखेडा जवळील सातपुड्याच्या कुशीत मनुदेवीचे मंदिर आहे. तेथे दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पिठोरी अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी यात्रा असते. राज्यभरातून तसेच शेजारी मध्य प्रदेश व गुजरातमधून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, यंदा सर्वत्र कोरोनाचा प्रार्दुभाव वाढल्याने राज्य शासनाने मंदिर उघडण्यास बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर नियोजित यात्रोत्सव रद्द झाला आहे.
पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी नुकतीच मंदिराला भेट देवून संस्थानचे अध्यक्ष शांताराम पाटील, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, नितीन पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांची भेट घेतली. मंदिरात पारंपरिक पध्दतीने पूजा करावी. मात्र, मंदिर भाविकांसाठी बंद ठेवावे, असा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.