जळगाव -शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षभरापासून सुरु आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरु असल्याने नागरिकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, हे काम मुदतीत पूर्ण करण्यासाठी बांधकाम विभागाने ‘टी’ आकाराचा पूल मंजूर केला असताना ‘टी’ आकाराला स्थगिती देवून ‘एल’ आकाराच्याच पुलाचे काम सुरु केले आहे. ‘टी’ आकारासाठी विद्युत खांबच अडथळा ठरत असून, हे खांब हटविण्याचे काम महावितरण कंपनी करेल की मनपा, यामध्येच हे काम अडकलेले आहे.
तोपर्यंत पुलाचेही काम लांबत जाईल -
शिवाजीनगरचा उड्डाणपुल मुदतीत पूर्ण होणे कठीण असल्याने ‘टी’ आकाराच्या पुलाला स्थगिती देण्यात आली असून, विद्युत खांबचा अडथळा दुर झाल्यानंतरच ‘टी’ आकाराचा विचार होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून शहरातील शिवाजीनगर उड्डाणपूलाच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. मात्र, हे काम सुरु असताना पुलालगत व खालच्या बाजूला असलेले महावितरणचे विद्युत खांब हटविले गेले नसल्याने काम अतिशय संथगतीने सुरु आहे. पुढील कामाला या विद्युत खांबमुळे अडथळा येत असून, हे खांब हटविण्याचे काम जोपर्यंत लांबत जाणार आहे. तोपर्यंत पुलाचेही काम लांबत जाईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
३१ मार्चपर्यंत आहे कामाची मुदत -
पुलाचे काम पूर्ण करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंतची आहे. त्यामुळे आता महावितरणची वाट न पाहता बांधकाम विभागाने ‘एल’ आकाराच्या पुलाचे काम पूर्ण करण्याची तयारी सुरु केली आहे. पूर्वीप्रमाणेच पूल तयार झाला, तर त्यावरून वाहतूक सुरु होवू शकते. त्यानंतर विद्युत खांब काढण्यात आले, तर पुढे शिवाजीनगर भागातील अमर चौकपर्यंत मार्ग काढता येवू शकतो, असे मत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
आतापर्यंत ६० टक्के झाले आहे काम -