जळगाव - राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याच जळगाव ग्रामीण मतदारसंघात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याची मागणी करण्याकरिता सावरखेडा शिवारातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा ( women Agitation in Gulabrao Patils constituency ) काढला. हा मोर्चा मनसेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.
अनेक वर्षांपासून जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारात असलेल्या वाघनगरमध्ये नागरिकांना नळ कनेक्शन ( Water issue in Jalgaons Waghnagar ) मिळालेले नाही. उन्हाळ्यात सुरू झाला की या ठिकाणच्या बोअरिंगही आटतात. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. याबाबत अनेकदा सरकार प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र, कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. नागरिकांनी मनसेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर ( women Agitation with MNS leaders ) मोर्चा काढला.
हेही वाचा-Somaiya On Malik : महाराष्ट्राला घोटाळे मुक्त करणार - किरीट सोमय्या
डोक्यावर हंडा घेऊन महिला मोर्चात सहभागी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रहिवाशांना सोबत घेत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला. डोक्यावर हंडा घेऊन मोठ्या संख्येने महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर घोषणाबाजी करण्यात आली. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे नव्हे तर केवळ धरणगावचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या मतदारसंघातील नागरिकच पाण्यापासून वंचित असल्याने इतर ठिकाणची काय परिस्थिती असेल हे न बोललेच बरे? गेल्या पंधरा वर्षांपासून नागरिकांना पाण्यापासून पाण्याच्या सुविधांपासून वंचित आहे.