जळगाव - शहरातील पवननगरात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हा परिसर तत्काळ सील करण्यात आला आहे. महापौर भारती सोनवणे यांनी लागलीच त्याठिकाणी भेट देत संपूर्ण परिसर लागलीच सॅनिटायझ करण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला केल्या. दरम्यान, कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे.
जळगावच्या पवननगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला, प्रशासनाकडून परिसर सील - जळगाव कोरोना अपडेट
शहरातील पवननगरात एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हा परिसर तत्काळ सील करण्यात आला आहे. महापौर भारती सोनवणे यांनी लागलीच त्याठिकाणी भेट देत संपूर्ण परिसर लागलीच सॅनिटायझ करण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला केल्या. दरम्यान, कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे.
![जळगावच्या पवननगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला, प्रशासनाकडून परिसर सील jalgaon](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7107249-826-7107249-1588906611913.jpg)
पवननगरातील नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा, खबरदारी म्हणून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. परिसरातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, चेतन सनकत, नगरसचिव सुनील गोराणे, मलेरिया विभागाचे सुधीर सोनवाल, डॉ.राम रावलानी, डॉ.संजय पाटील, डॉ.विजय घोलप, आबा बाविस्कर, शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे आदींनी पाहणी केली. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येताच परिसरात तात्काळ सॅनिटायझेशन करण्यात आले. रुग्णाच्या घरासह परिसरात मलेरिया विभागाकडून स्प्रिंकलर मशिनद्वारे फवारणी करण्यात आली.
परिसरात येण्या-जाण्यास मनाई-
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येताच पवननगर परिसर सील करण्यात आला असून या परिसरात येण्या-जाण्यास मनाई करण्यात आली आहे. बांबूच्या दांड्यानी या परिसरातील रस्ते अडवण्यात आले आहेत. महापालिकेच्या वतीने या परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी शुक्रवारपासून सर्वेक्षण होणार आहे.