महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Woman Stabbed : जळगावातील आशाबाबा नगर येथे महिलेवर चाकूने वार - महिलेवर चाकूने वार

लिव्ह इन रिलेशनशिपच्या ( live in relationship ) संबंधातून जळगावात एका महिलेवर चाकूने वार करून जखमी केल्याची घटना घडली ( Woman Stabbed In Jalgaon ) आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात ( Ramanandnagar Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.

ramanandnagar police station
रामानंदनगर पोलीस ठाणे

By

Published : May 21, 2022, 2:21 PM IST

जळगाव- तरुणासोबत लिव्ह इन रिलेशीपमध्ये ( live in relationship ) राहत असलेली ३० वर्षीय महिला तरुणाला सोडून तिच्या आईकडे निघून गेली. याचा राग आल्याने तरुणाने महिलेवर चाकूने वार केल्याची गंभीर घटना जळगाव शहरातील आशाबाबा नगर येथे ( Woman Stabbed In Jalgaon ) घडली. या घटनेत महिला जखमी झाली आहे. याप्रकरणी गुरुवार, १९ मे रोजी गुन्हा दाखल होवून रामानंदनगर पोलिसांनी चार जणांना अटक केली ( Ramanandnagar Police Station ) आहे.


हातावर, डोक्यावर चाकूने वार :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील गेंदालाल मील भागातील ३० वर्षीय महिला रामानंदनगर परिसरातील बंटी उर्फ प्रदुम्न नंदू महाले यांच्यासोबत लीव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहते. महिला बंटी यास सोडून तिच्या आईकडे राहायला गेल्याच्या रागातून बंटी याने १८ मे रोजी आशाबाबनगर येथे महिलेच्या हातावर व डोक्यावर चाकूने वार केले. तसेच चाकूने दहशत निर्माण केली. तर बंटी सोबतच्या इतर तिघांनी तक्रार करु नये म्हणून महिलेला रिक्षातून पळवून नेले.

चौघे अटकेत :महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन गुरुवार, १९ मे रोजी बंटी ऊर्फ प्रदुन्म नंदू महाले रा. रामानंदनगर, अरबाज अमजद खान पठाण रा.आझाद नगर, गुलशन रजा रा.चिश्तीया मशीदजवळ, समाधान हरचंद भाई रा. खंडेराव नगर व सोनू ऊर्फ समीर शेख लुकमान शेख रा.पिंप्राळा हुडको या चार जणांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक शांताराम पाटील हे करत आहेत.

हेही वाचा : Unique Love Story : अजब प्रेमाची, गजब कहाणी.. ६७ वर्षीय रामकली पडली २८ वर्षीय भोलूच्या प्रेमात.. 'लिव्ह इन' मध्ये राहण्याचा निर्णय

ABOUT THE AUTHOR

...view details