जळगाव - कानांत हेड फोन लाऊन रेल्वे रूळ ओलांडणे तरुणीस चांगलेच महागात पडले आहे. रेल्वेचा आवाज ऐकू न आल्याने रेल्वेचा धक्का लागून तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला. ही घटना जळगाव शहरात घडली आहे. दरम्यान, मृत मुलीच्या आईने तिचे आणि तिच्या नवऱ्याचे नेहमीच भांडणे होत होती. तिचा नवरा तिच्यावर नेहमीच शक घेत होता, असा आरोप केला आहे.
काम आटपून जात होती घरी -जळगाव शहरात काळेनगर भागात राहणारी स्नेहल उजेंनकर ही वीस वर्षांची तरुणी एका खासगी दुकानात कामाला होती. काम आटोपून घरी जात असताना, ती नेहमीच कानात हेडफोन लाऊन घराकडे जात असे, घराकडे जात असताना शिवाजी नगर उड्डाण पुलाच्या जवळ रेल्वे रुळ ओलांडताना त्या ठिकाणी असलेला अंधार आणि कानात असलेल्या हेडफोनमुळे तिला समोरून येणाऱ्या रेल्वेचा आवाज न आल्याने तिला रेल्वेची धडक बसली. सुरत भुसावळ पॅसेंजरची जोरदार धडक बसल्याने ती रुळावरून बाहेर फेकली गेल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. मृत्यूनंतर ही हेडफोन तिच्या कानात आढळून आल्याचे, हेड फोन मुळेच तिला रेल्वेचा अंदाज न आल्याने मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.