जळगाव - भुसावळ येथील नातेवाईकाचे लग्न आटोपून जळगावच्या दिशेने दुचाकीने परत येणाऱ्या दाम्पत्यावर आज सायंकाळी काळाने झडप घातली. जळगाव येथील प्रभात कॉलनी परिसरात राहणारे लीना किशोर तळेले व त्यांचे पती किशोर हिरामण तळेले हे दाम्पत्य भुसावळ येथे लग्नसमारंभात गेले होते. लग्नकार्य आटोपून ते जळगावच्या दिशेने दुचाकीने परत येत होते. दरम्यान महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपानजीक सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत दोघे दाम्पत्य जोरात फेकले गेले. या अपघातात लिना तळेले या ठार झाल्या. त्यांचे पती किशोर तळेले हे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळी पोलिसांची धाव-
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ हजर झाले. मृत लिना तळेले यांचा मृतदेह सामान्य रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच अपघातामुळे ठप्प झालेली वाहतुक सुरळीत सुरु करण्यात आली. या प्रकरणी पुढील कारवाई पोलीस उपनिरीक्षक विशाल वाठोरे व सचिन मुंडे करत असून धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध सरु आहे.