जळगाव -शहरातील नागरिकांना कराची रक्कम भरल्यावर देखील मुलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. जळगावकरांना रस्ते, गटारी, स्वच्छता, आरोग्याचा प्रश्नांना सामोरे जावे लागत असताना, मनपातील सत्ताधारी भाजपने जळगाव शहरालगत असलेल्या आव्हाणे, कुसूंबा, मोहाडी, सावखेडा व मन्यारखेडा या पाच गावांचा समावेश मनपा हद्दीत करण्याचा ठराव शुक्रवारी बहूमताने मंजूर करून घेतला आहे. या ठरावाला शिवसेना व एमआयएमच्या नगरसेवकांनी विरोध केला आहे. एकीकडे जळगावकरांना सुविधा मिळत नसताना, दुसरीकडे अशा प्रकारचा अव्यवहार्य असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी केला आहे.
महापालिकेच्या दोन विशेष महासभा शुक्रवारी महापौर भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडल्या. यावेळी उपमहापौर सुनील खडके, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते. दोन्ही महासभेत एकूण ८५ विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यात ७५ विषयांना महासभेने मंजुरी दिली. दोन विषय तहकूब करण्यात आले. ७ विषय नामंजूर करण्यात आले. स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी मनपाची हद्दवाढ करण्याचा प्रस्तावावरून महासभेत चांगलाच गोंधळ झाला. शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध केला, तर सत्ताधारी भाजपने हा विषय विरोधानंतरही मंजुर करून घेतला.
गावांमध्ये सुविधा मिळत नसल्याने हद्दवाढ करा -
भाजपच्या राजेंद्र घुगे-पाटील, चेतन सनकत, कुलभुषण पाटील, नवनाथ दारकुंडे व प्रतीभा कापसे या पाच नगरसेवकांनी शहरालगत असलेली पाच गावे महापालिका हद्दीत समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला होता. या प्रस्तावाला भाजपने बहूमताने मंजुरी दिली. तसेच मंजूरी देताना शहराची हद्दवाढ झाल्यास शहरालगत असलेल्या गावांमध्ये चांगल्या सुविधा देण्यात येतील व महापालिकेचे उत्पन्नाचे स्त्रोत देखील वाढतील असे मत राजेंद्र घुगे-पाटील यांनी व्यक्त केले.
जळगावकरांना सुविधा देण्यास बोंब, गावातील नागरिकांना काय देणार -