महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Young Man Drowns Jalgaon : मित्रासोबत फोटो काढायला गेला.. पाय घसरला अन् बंधाऱ्यात बुडून तरुणाचा मृत्यू - पाय घसरून बंधाऱ्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू

जळगावातील कांताई बंधाऱ्यावर फिरायला गेलेल्या तरुणाचा फोटो घेत असताना बंधाऱ्यात पाय घसरल्याने बुडून मृत्यू ( Young Man Drowns Jalgaon ) झाला. आज दुपारी ही घटना घडली आहे.

मित्रासोबत फोटो काढायला गेला.. पाय घसरला अन् बंधाऱ्यात बुडून तरुणाचा मृत्यू
मित्रासोबत फोटो काढायला गेला.. पाय घसरला अन् बंधाऱ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

By

Published : Mar 13, 2022, 9:36 PM IST

जळगाव : मित्रांसोबत फोटो काढतेवेळी पाय घसरुन बंधार्‍यात पडल्याने तरूणाचा बुडून मृत्यू ( Young Man Drowns Jalgaon ) झाल्याची घटना आज रविवारी दुपारी जळगाव तालुक्यातील कांताई बंधाऱ्यात घडली. शुभम कांतीलाल चव्हाण ( वय-२०, रा.वानखेडे सोसायटी, जळगाव ) असे मयत तरूणाचे नाव आहे.

एक जण वाचला

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील वानखेडे सोसायटी साईबाबा मंदिराजवळ भागात राहणारा शुभम चव्हाण हा तरुण रविवारी दुपारी त्याच्या पाच मित्रांसोबत कांताई बंधाऱ्यावर फिरायला गेला होता. यावेळी या ठिकाणी फोटो काढत असतांना शुभमसह एका जणाचा पाय घसरून ते पाण्यात पडले. यापैकी एकाला वाचण्यावित मित्राला यश आले. परंतु शुभम चव्हाण हा पाण्यात बुडाला व त्याचा मृत्यू झाला आहे.

एकुलता एक मुलगा

मयत शुभमच्या पश्चात दोन बहिणी, आई-वडील आणि आजोबा असा परिवार आहे. शुभमचे वडील शहरातील नवीन बी.जे. मार्केटमध्ये चव्हाण इलेक्ट्रिकल्स नावाच्या दुकानात काम करतात. शुभम हा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .घटनेची माहिती मिळताच शुभमच्या नातेवाइकांनी घटनास्थळ गाठुन आक्रोश केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शेवटचे वृत्त आली तोपर्यंत मृतदेहाचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

ABOUT THE AUTHOR

...view details