जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अतिशय वेगाने फैलावत आहे. परंतु, नागरिकांना कोणत्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे पाहायला मिळत आहे. रविवारी जिल्ह्यातील चोपडा येथे भरलेल्या आठवडे बाजारात नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्रासपणे उल्लंघन केले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न होत असताना नागरिक मात्र, हलगर्जीपणा करत आहेत. त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेच्या मेहनतीवर पाणी फिरत असल्याचे चित्र आहे.
जळगाव : चोपडा आठवडी बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा - जळगाव कोरोना फैलाव बातमी
चोपडा शहरात दरम्यान, रविवारी भरलेल्या आठवडी बाजारात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी भाजीपाला, फळे तसेच इतर साहित्य विक्रेते यांच्याकडून कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली नव्हती. बाजारातील अनेक दुकानांवर नागरिकांची गर्दी झाली होती. बैल बाजारात तर खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळल्याचे चित्र होते.

चोपडा शहरात प्रत्येक आठवड्याला रविवारी आठवडे बाजार भरतो. या बाजारात खरेदीसाठी तालुकाभरातून नागरिक येत असतात. येथील बैल बाजारदेखील प्रसिद्ध आहे. दरम्यान, रविवारी भरलेल्या बाजारात नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी भाजीपाला, फळे तसेच इतर साहित्य विक्रेते यांच्याकडून कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली नव्हती. बाजारातील अनेक दुकानांवर नागरिकांची गर्दी झाली होती. बैल बाजारात तर खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती.
बाजारात प्रमाणाबाहेर गर्दी झाल्याचे समजल्यानंतर नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी गर्दी पांगवण्यासाठी बाजारात दाखल झाले होते. परंतु, नागरिक ऐकून घेत नव्हते. अनेक दुकानदारांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाहून तात्पुरती गर्दी बाजूला करून, पुन्हा खबरदारीकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, चोपडा शहरातदेखील कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. सद्यस्थितीत चोपड्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 364 इतकी झाली आहे. त्यात 115 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, 20 जणांचा मृत्यू झाला असून, 229 जणांनी कोरोनावर मात केली आहे. अशी परिस्थिती असताना देखील नागरिकांना गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.