जळगाव - थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रेल्वेद्वारे परराज्यातून अमली पदार्थांची तस्करी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरपीएफने संपूर्ण विभागात दक्षतेच्या उपाययोजनांना सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रत्येक गाडीतील स्लिपर काेचमधील पार्सल, माेठी खाेकी आणि संशयित वाटणाऱ्या साहित्याची तपासणी केली जात आहे.
श्वानाद्वारे साहित्याची तपासणी-
आरपीएफचे आयुक्त क्षितिज गुरव यांनी विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. विभागातील नाशिकराेड ते बडनेरा आणि खंडवा ते भुसावळ या मार्गावरील सर्वच माेठ्या स्थानकांवर तपासणी केली जात आहे. सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये आरपीएफ जवान गस्त करत आहेत. श्वानाद्वारे साहित्याची तपासणी केली जात आहे.
जळगावात अमली पदार्थ तस्करी राेखण्यासाठी दक्षता - jalgaon breaking news
शहरात अमली पदार्थांची तस्करी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमली पदार्थ तस्करी राेखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
अमली पदार्थ तस्करी राेखण्यासाठी दक्षता
या भागातील गाड्यांवर लक्ष-
दिल्ली, अंबालाकडून येणाऱ्या गाड्यांमधून गांजा तस्करी, गुजरातमधून येणाऱ्या गाड्यांमध्ये तंबाखू, तर वाराणसी भागातून येणाऱ्या गाड्यांमधून सिगरेट, बिडी आणि काेकण व चंद्रपूर भागातून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून दारूची तस्करी होत, असल्याने दक्षता बाळगली जात आहे.
हेही वाचा-यूपीत आता वाहनांवर जातीचा उल्लेख केल्यास जप्तीसह दंडही