जळगाव - जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी आरोग्य विभागातील 443 अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. दरम्यान, पहिल्या दिवशी 700 आरोग्य सेवकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट होते, पण हे उद्दिष्ट साध्य करता आले नाही.
हेही वाचा -धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्याचा कुणालाही अधिकार नाही - गुलाबराव पाटील
आज सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे कोरोना लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, डॉ. जयकर यांच्यासह आयएमए, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आदी उपस्थित होते.
असे झाले लसीकरण