जळगाव :शाळेत दर शनिवारी दफ्तरमुक्त शाळा हा उपक्रम राबविण्यात येतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रार्थना झाल्यावर अभ्यासक्रमातील कविता, ओव्या म्हणून कवायत आणि व्यायाम करून घेतला जातो. त्यानंतर विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास व्हावा त्यांच्यात नेतृत्व गुण निर्माण व्हावे म्हणून विविध विषयांवर त्यांना भाषण करायला सांगितले जाते. सामूहिक वृत्तपत्रे वाचन तसेच इंग्रजी भाषेची भीती कमी व्हावी यासाठी देखील प्रयत्न केले जाते. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी अशी माहिती दिली.
दप्तरमुक्त शाळा : सध्या सर्व पालकांना आपल्या मुलांनी इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये शिक्षण घ्यावे असे वाटत असते. त्यामुळे मराठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ही कमी होत चालली आहे. त्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी यासाठी जळगाव जिल्ह्यातील पिलखेडे गावातील शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे ठरविले. दप्तरमुक्त शाळा हा अनोखा उपक्रम या शाळेत राबविला जातो. त्याचमुळे या शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती 100 टक्केवर पोहोचली आहे. याच माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास ही वाढला आहे. यामुळेच इतर खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनीही या शाळेत प्रवेश घेतला आहे.
विविध विषयांवर भाषण :या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेत दर शनिवारी दफ्तरमुक्त शाळा हा उपक्रम राबविण्यात येतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रार्थना झाल्यावर अभ्यासक्रमातील कविता, ओव्या म्हणून कवायत आणि व्यायाम करवून घेतला जातो. त्यानंतर विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास व्हावा त्यांच्यात नेतृत्व गुण निर्माण व्हावे म्ह्णून विविध विषयांवर त्यांना भाषण करायला सांगितले जाते. या संदर्भातील माहिती शाळेचे उपक्रमशील शिक्षक किशोर सोनवणे यांनी दिली. शाळेतील विद्यार्थी दोन ते तीन दिवस शाळेत आला नाही की, त्याच्या घरी जाऊन शिक्षक विचारपूस करतात. तर आजारी विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन करून योग्य तो सल्ला दिला जातो.