जळगाव -पत्नीच्या उपचाराचा खर्च परवडत नसल्याने पतीने आपल्या गतिमंद मुलासह विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना शहरातील आदर्शनगरात घडली. दीपक रतीलाल सोनार (वय 64) व परेश दीपक सोनार (वय 35) अशी मृत पिता-पुत्रांची नावे आहेत. या घटनेमुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरातील आदर्शनगरात दीपक सोनार हे पत्नी श्रद्धा, मुलगा परेश यांच्यासह राहत होते. दागिने पॉलिश करून कुटुंबाचा उदरनिर्वाह सोनार यांच्या पत्नी चालवत होत्या. चार दिवसांपासून श्रद्धा सोनार यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. न्युमोनियाचे निदान झाल्याने चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाने चार दिवसांच्या उपचारासाठी दीड लाख रुपये बिल काढले. बिलाचे हे पैसे सोनार यांची मुलगी व जावयाने भरले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे पुन्हा त्यांच्या उपचारासाठी साधारण चार ते पाच लाख रुपये खर्च येईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. उपचाराचा खर्च पेलवणारा नसल्याने काय करावे? अशी चिंता दीपक सोनार यांना होती. याच विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज आहे.
हेही वाचा -वझेंची एकाच दिवशी दुसऱ्यांदा बदली, नियंत्रण कक्षातून आता नागरी सुविधा केंद्रात
मुलगी जावई आले होते भेटायला -