जळगाव -जळगाव-भुसावळ रस्त्यावरील दूरदर्शन टॉवरजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात जळगावातील दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.परवेज निसार खाटीक व अमिर जाकीर खाटीक (दोघे रा. जळगाव), असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकांचे नाव आहे.
परवेज व अमिर हे दोघे कामानिमित्त भुसावळ येथे गेले होते. शनिवारी (दि. 26 मार्च) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दूरदर्शन टॉवरच्या समोरच्या अरूंद रस्त्यावर त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात परवेज याचा जागीच मृत्यू झाला तर अमीर याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारावेळी ताचा मृत्यू झाला.