महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भुसावळ येथे नायब तहसीलदारांना धक्काबुक्की; दोन जणांवर गुन्हा दाखल - भुसावळ तहसील कार्यालय

भुसावळ तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार शशिकांत इंगळे हे संध्याकाळी काम करीत होते. त्याचवेळेस सुरडकर व जाधव यांनी इंगळे यांच्याकडे रेशनकार्ड आरसी नंबर मागितला. ते काम नागरगोजे यांच्याकडे आहे. त्यांची बदली झाली असल्याचे सांगितले असता दोघांनी वाद घालण्यास सुरुवात केली. टेबलवर हात आपटत दोघांनी शिवीगाळ केली.

भुसावळ तहसील कार्यालय
भुसावळ येथे नायब तहसीलदारांना धक्काबुक्की

By

Published : May 21, 2021, 10:29 AM IST

जळगाव -जिल्ह्यातील भुसावळ तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यामध्ये दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पप्पू सुरडकर, लक्ष्मण जाधव (रा. कंडारी ता. भुसावळ) अशी या गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

प्रतिक्रिया - नायब तहसीलदार संजय तायडे

तहसील कार्यालयात गोंधळ -

शशिकांत इंगळे हे संध्याकाळी काम करीत होते. त्याचवेळेस सुरडकर व जाधव यांनी इंगळे यांच्याकडे रेशनकार्ड आरसी नंबर मागितला. ते काम नागरगोजे यांच्याकडे आहे. त्यांची बदली झाली असल्याचे सांगितले असता दोघांनी वाद घालण्यास सुरुवात केली. टेबलवर हात आपटत दोघांनी शिवीगाळ केली. यावर इंगळे यांनी उद्या संबंधित क्लर्क आल्यावर नंबर मिळवून देईल, असे समजावले. तरीही हे दोघे त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यांना धक्काबुक्की करीत धमकीही दिली. या प्रकाराने तहसील कार्यालयात एकच गोंधळ झाला.

महसूल कर्मचारी आले एकत्र, पोलिसात तक्रार -

याप्रकरणी महसूल कर्मचाऱ्यांनी एकत्र येत शहर पोलीस ठाणे गाठून निवेदन दिले. यावेळी नायब तहसीलदार संजय तायडे, योगेश मुस्कावाड, बी.एन. शिरसाठ, सुदाम नागरे, जितेश चौधरी, रवींद्र धांडे, अमोल पाटील, रमाकांत सपकाळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

हेही वाचा - विनाकारण फिरणाऱ्यांची रुग्णवाहिकेतून रवानगी? कोल्हापुरातील व्हिडिओचे सत्य

ABOUT THE AUTHOR

...view details