महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा सीडीआर काढण्यासाठी पाच लाखांची ऑफर; क्रूझ ड्रग्स प्रकरणी हॅकरचा दावा - pooja dadlani cdr hacker manish bhangale claims

मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणात काहीतरी काळबेर आहे, असा संशय आणि दावा जळगावातील इथिकल हॅकर मनीष भंगाळे याने केला आहे. या संदर्भात भंगाळे याने मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिले असून, प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर दाऊदच्या पत्नीशी संभाषण झाल्याचा दावा केल्याने भंगाळे चर्चेत आला होता.

hacker manish bhangale claims
क्रूझ ड्रग्स प्रकरणी हॅकरचा दावा

By

Published : Oct 27, 2021, 8:50 PM IST

Updated : Oct 27, 2021, 10:22 PM IST

जळगाव -आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा सीडीआर काढण्याचे सांगितला होता, असा गौफ्यस्फोट जळगावातील इथिकल हॅकर मनीष भंगाळेने केला. पुराव्याची छेडछाड करण्यासाठी 5 लाखांची ऑफर दिली असा दावाही त्याने केला.

इथिकल हॅकर मनीष भंगाळे यांच्यासोबत प्रतिनिधींनी साधलेला संवाद

आर्यन प्रकरणात हँकर मनीष भंगाळेच्या एन्ट्री

मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणात काहीतरी काळबेर आहे, असा संशय आणि दावा जळगावातील इथिकल हॅकर मनीष भंगाळे याने केला आहे. या संदर्भात भंगाळे याने मुंबई पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिले असून, प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर दाऊदच्या पत्नीशी संभाषण झाल्याचा दावा केल्याने भंगाळे चर्चेत आला होता.

भंगाळे याने नेमका काय दावा केलाय?

6 ऑक्टोबरला जळगावमध्ये भेटलेल्या अलोक जैन आणि शैलेश चौधरी या दोन व्यक्तींनी माझ्याकडे पूजा दलानीच्या नावाने सेव्ह असणाऱ्या नंबरचा सीडीआर काढून मागितला. अलोक जैन आणि शैलेश चौधरी ही दोन माणस मला भेटली आणि त्यांनी सीडीआर काढून मिळेल का? अस विचारत पूजा ददलानी या नावाने सेव्ह असणारा नंबर मला दाखवला. एक व्हाट्सएप चॅटचा बॅकअपही त्यांनी मला दाखवला. जो आर्यन खान नावाने सेव्ह होता. क्रूझ ड्रग्स प्रकरणात काहीतरी काळबेर आहे, असा माझा संशय असल्याचे भंगाळे याचे म्हणणे आहे.

5 लाखांची दिली ऑफर -

हे काम केलं तर तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील अस सांगत त्यांनी मला ऍडव्हान्स 10 हजार रुपये दिले. जाताना त्यांनी मला एक नंबर दिला, जो truecaller वर सॅम डिसुझा या नावाने दिसतोय. त्या दोघांनी प्रभाकर साईल या नावाने सीमकार्ड काढून मिळेल का असेही विचारले, असा दावाही भंगाळे केला आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिले पत्र -

प्रभाकर साईल याला टीव्हीवर पाहिल्यानंतर मला या गोष्टी लक्षात आल्या, असे भगाळे यांनी म्हटले आहे. आर्यन प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड करण्यासाठी मला 5 लाखांची ऑफर होती, असा मनीष भगाळे यांचा दावा आहे. याबाबत त्याने आता मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले असून, चौकशीची मागणी केली आहे.

Last Updated : Oct 27, 2021, 10:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details