जळगाव - दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या मरकझ कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर रत्नागिरी येथील मूळ रहिवासी असलेले दोघे जळगावात आलेले होते. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली कारवाई पाहून ते जळगावातच लपले होते. मात्र, याची माहिती होताच जळगाव पोलिसांनी दोघांना पकडले आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
निजामुद्दीनचा कार्यक्रम आटोपून जळगावात लपलेल्या रत्नागिरीच्या दोघांना पकडले - कोरोना संभावित
रत्नागिरी येथील 2 जण दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या मरकझ कार्यक्रमाला गेलेले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते जळगावात आले होते. मात्र, याची माहिती होताच जळगाव पोलिसांनी दोघांना पकडले आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रत्नागिरी येथील 2 जण दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या मरकझ कार्यक्रमाला गेलेले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते जळगावात आले होते. जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या एका मशिदीजवळ ते खोली घेऊन राहत होते. या प्रकाराची कुणकुण आजूबाजूच्या लोकांना लागली होती. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने याची माहिती रामानंदनगर पोलीस ठाण्यात कळवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने दोघांचा शोध घेतला.
दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. त्यांचे नमुने घेतले असून त्यांना क्वारंटाईन केले आहे. दरम्यान, पोलिसांनी दोघांचा शोध घेतल्यानंतर त्यांनी सुरुवातीला आपली खरी ओळख लपवली. त्यामुळे संशय वाढला आहे. आता त्यांच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल काय येतो? याकडे लक्ष लागले आहे.