महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात मंगळवारी 217 कोरोनाबाधित वाढले;11 जणांचा बळी!

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजार 803 वर पोहोचला आहे. चिंतेची बाब म्हणजे, मंगळवारी देखील जिल्ह्यात 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 293 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Jalgaon corona update
जळगाव कोरोना अपडेट

By

Published : Jul 8, 2020, 11:34 AM IST

जळगाव -जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. जिल्हा प्रशासनाला मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 217 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजार 803 वर पोहचला आहे. चिंतेची बाब म्हणजे, मंगळवारी देखील जिल्ह्यात 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जळगावसह अमळनेर आणि भुसावळ नगरपालिका परिसरात 7 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाची साखळी तोडणे शक्‍य असले तरी, यापूर्वी एकमेकांच्या संपर्कात आलेल्यांमुळे कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. जिल्ह्यात मंगळवारी पुन्हा 217 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये जळगाव शहर 92, जळगाव ग्रामीण 11, भुसावळ 6, अमळनेर 1, चोपडा 11, भडगाव 5, धरणगाव 2, यावल 6, एरंडोल 3, जामनेर 5, रावेर 15, पारोळा 26, चाळीसगाव 18, बोदवड 15 तसेच इतर जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

मंगळवारी 11 जणांचा मृत्‍यू-

कोरोनाची लागण झाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या अनेक रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाहीये. वयोवृद्ध किंवा रोगप्रतिकारक शक्‍ती कमी असलेल्यांना अधिक त्रास होवून त्यांचा मृत्यू होत आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांपैकी 215 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचा अहवाल वैद्यकीय महाविद्यालयाने दिला आहे. तर सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 293 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जळगाव शहरात रुग्णसंख्येने ओलांडला हजारांचा टप्पा-

जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात मंगळवारी सर्वाधिक 92 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले. मंगळवारी आढळून आलेले बहुतांश रुग्ण हे नवीन परिसरातील आहेत. यामुळे शहरातील एकूण बाधितांचा आकडा 1 हजार 95 वर पोहचला आहे.

कोरोना अपडेट-

जळगाव शहर 1095

जळगाव ग्रामीण 198

भुसावळ 490

अमळनेर 392

चोपडा 321

पाचोरा 107

भडगाव 259

धरणगाव 202

यावल 281

एरंडोल 238

जामनेर 249

रावेर 350

पारोळा 286

चाळीसगाव 93

मुक्ताईनगर 81

बोदवड 146

एकूण रुग्णसंख्या 4803

ABOUT THE AUTHOR

...view details