जळगाव -श्रावण सोमवारी महादेवाचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात दोघे भाविक जागीच ठार झाले तर ८ जण जखमी झाले आहेत. हा अपघात जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील पाल गावाजवळ सोमवारी रात्री उशिरा घडला. गोलू बंडू परदेशी (वय २६) व प्रशांत साहेबराव तांदुळकर (वय ३६) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. दोघे जळगाव शहरातील कांचननगरातील रहिवासी होते.
- मालवाहू वाहनाने गेले होते दर्शनाला-
जळगाव शहरातील कांचननगरातील काही तरुण भाविक मालवाहू गाडी (एमएच- १९ सीवाय ५३१५) मधून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेवर असलेल्या शिरवेल येथे महादेवाच्या दर्शनासाठी गेलेले होते. दर्शन घेऊन सोमवारी रात्री हे सर्व जण घरी परतत होते. पालजवळ वनविभागाच्या नाक्यापासून काही अंतरावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकली. ही धडक इतकी भीषण होती की गाडी रस्त्याच्या कडेला उलटली.
- दोघे ठार तर इतर जण जखमी-