महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावातील दोन सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार; दोन वर्षांच्या काळासाठी कारवाई - जळगाव पोलीस

वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये आठ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या दोघांनी गुन्हेगारी टोळी तयार केली होती.

Two criminals from Jalgaon
Two criminals from Jalgaon

By

Published : Jun 6, 2021, 4:48 PM IST

जळगाव - वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये आठ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. या दोघांनी गुन्हेगारी टोळी तयार केली होती. राहूल रामचंद्र बऱ्हाटे (वय २७, रा. रामेश्वर कॉलनी) व गाेलू उर्फ दत्तू नारायण चौधरी (वय २६, रा. तुकारामवाडी) अशी हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून राहूल व गोलू हे दोघे शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने घातक शस्त्र बाळगून फिरत होते. वेळोवेळी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत. दोघांवर जिल्हापेठ व एमआयडीसी पोलीस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दंगल, मारहाण करणे, दहशत परवणे, घरांवर अतिक्रमण करुन बळकावणे, घरात अनधिकृत प्रवेश करणे, यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सहा महिन्यांपासून त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू होते. त्यानंतरही या दोघांनी एमआयडीसी परिसरात एका तरुणास जुन्या भांडणाच्या कारणावरुन चाॅपरने वार करुन जखमी केले होते.

धुळे शहरात केले स्थानबद्ध -

दरम्यान, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी दोघांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, अतुल वंजारी, सचिन पाटील, योगेश बारी, इम्रान सय्यद, गोविंदा पाटील यांच्या पथकाने दोघांना धुळे शहरात स्थानबद्ध केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details