महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव : दुचाकी चोरणाऱ्या दोघांना घार्डी येथून अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - जळगाव गुन्हे वार्ता

जळगाव शहरातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना घार्डी येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री अटक केली.

two bike thief arrested from ghardi village by local crime branch in jalgaon
जळगाव : दुचाकी चोरणाऱ्या दोघांना घार्डी येथून अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

By

Published : Dec 7, 2020, 5:52 PM IST

जळगाव -शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप येथून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना घार्डी या गावातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ही कारवाई रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास करण्यात आली. दीपक भास्कर सपकाळे (२४) आणि ईश्वर जगन्नाथ सपकाळे (२८), असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

घार्डी फाटा येथून केली अटक -

शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप येथून दुचाकी चोरणारे दोघे घार्डी या गावात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही संशयित आरोपींना घार्डी फाटा येथील एका पान टपरीवरून अटक केली. या आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर या दोघांना अटक करून जळगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा - मनी लॉन्ड्रिंग प्रकरण : अमित चांदोलेची न्यायालयीन कोठडी रद्द; ईडीला पुन्हा मिळणार त्याची कस्टडी

ABOUT THE AUTHOR

...view details