महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चोरीच्या रिक्षात घरफोडीच्या उद्देशाने फिरणारे दोघे गजाआड, तर अल्पवयीन मुलासह चौघे फरार

घरफोडीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ते चोरीच्या रिक्षातून फिरत असताना पोलिसांनी संबंधित कारवाई केली आहे.

jalgaon crime news
चोरीच्या रिक्षात घरफोडीच्या उद्देशाने फिरणारे दोघे गजाआड, तर अल्पवयीन मुलासह चौघे फरार

By

Published : Sep 4, 2020, 12:06 PM IST

जळगाव - चोरी केलेल्या रिक्षातून घरफोडीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून चोरी केलेली रिक्षा जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईत पोलिसांनी दोघांना अटक देखील केली आहे. तर, या टोळीतील चौघांसह एक अल्पवयीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

शंकर विश्वनाथ साबणे (वय-19) व रईस समशेर पठाण (वय -21) अशी अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत. दोघे जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिलमधील रहिवासी आहेत. या कारवाईवेळी दोघांचे साथीदार असलेले हकीम मोहम्मद शहा (वय-20), अजीज रशीद पठाण (वय-22), मोहम्मद इस्माईल बिलाल (वय 36), दीपक प्रकाश भोसले (वय 20) यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा पळून गेला. हे सर्व जण देखील गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी आहेत.

शिवाजीनगर परिसरातील भुरे मामलेदार प्लॉटमधील राजकुमार चुन्नीलाल जयस्वाल यांनी लॉकडाऊनमुळे स्वत:ची रिक्षा घराबाहेर पार्क केली होती. ही रिक्षा चोरीला गेली. त्यामुळे जयस्वाल त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेनंतर गुरुवारी रात्रीच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी अक्रम शेख, रतन गीते, सुधीर साळवे हे शहरात गस्त घालत होते. त्यांना पहाटे साडेतीनच्या सुमारास महात्मा गांधी मार्केट समोरून एक भरधाव रिक्षा जाताना दिसली. या रिक्षाला त्यांनी हटकले. यानंतर रिक्षा भरधाव वेगाने पुढे गेली. यामुळे त्यांचा संशय बळावला.

पोलिसांनी दुचाकीवरून पाठलाग करत रिक्षा थांबवल्यानंतर त्यातील चौघांसह एक अल्पवयीन आरोपी पळून गेला. तर शंकर आणि रईस हे दोघे पोलिसांच्या हाती लागले. दोघांनी रिक्षा चोरी केल्याचे कबूल केले. चोरीच्या उद्देशाने आम्ही फिरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details