महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात दिवसभरात २१ रुग्णांचा मृत्यू, तर १ हजार १०३ कोरोनामुक्त - कोरोना रुग्णांचा मृत्यू

जळगावात शनिवारी पुन्हा २१ रुग्णांचा बळी गेला आहे. तर १ हजार ११५ नवे बाधित रुग्ण आढळले. २ दिवसांपासून नव्या बाधितांची संख्या ही एक हजारांच्या आत येत होती. मात्र, वीक-एन्डला पुन्हा रुग्णसंख्येच्या आकड्याने अकराशेचा टप्पा ओलांडला आहे.

जळगावात २१ रुग्णांचा मृत्यू
जळगावात २१ रुग्णांचा मृत्यू

By

Published : Apr 17, 2021, 10:37 PM IST

जळगाव- जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग काही केल्या कमी होत नसल्याची स्थिती आहे. शनिवारी पुन्हा २१ रुग्णांचा बळी गेला आहे. तर १ हजार ११५ नवे बाधित रुग्ण आढळले. २ दिवसांपासून नव्या बाधितांची संख्या ही एक हजारांच्या आत येत होती. मात्र, वीक-एन्डला पुन्हा रुग्णसंख्येच्या आकड्याने अकराशेचा टप्पा ओलांडला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे, शनिवारी दिवसभरात १ हजार १०३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. कोरोनाचे जिल्ह्यातील प्रमुख हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरासह चोपडा आणि भुसावळ तालुक्यातही कोरोनाचा संसर्ग वाढलेला दिसून येत आहे. राज्य शासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन होत नसल्याने संसर्ग कायम असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाभरातील आजची आकडेवारी

  • जळगाव शहर- २६०
  • जळगाव ग्रामीण- १५
  • भुसावळ- २१३
  • अमळनेर- १७
  • चोपडा- १२२
  • पाचोरा- ३६
  • भडगाव- १०
  • धरणगाव- ४५
  • यावल- ३८
  • एरंडोल- ५८
  • जामनेर- ६५
  • रावेर- ७७
  • पारोळा- ३१
  • चाळीसगाव- ४६
  • मुक्ताईनगर- ४२
  • बोदवड- ३४ आणि इतर जिल्हे ८ असे एकूण १ हजार ११५ बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

सक्रिय रुग्णसंख्या ११ हजार पार
जिल्हा प्रशासनाला आज प्राप्त झालेल्या तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या आता वाढून १ लाख ८ हजार २१८ इतकी झाली आहे. तर त्यापैकी ९५ हजार ७९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ११ हजार २३० रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

हेही वाचा -राज्यात शनिवारी 67 हजार 123 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 419 जणांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details