जळगाव -जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. जिल्हा प्रशासनाला गुरुवारी सायंकाळी दुसऱ्या टप्प्यात प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये तब्बल 29 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. धक्कादायक बाब म्हणजे, एकट्या जळगाव शहरात 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरवासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.
जळगावात २९ कोरोनाबाधितांची भर, रुग्णसंख्या 557
जिल्ह्यात गुरुवारी आणखी 29 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील भडगाव, नशिराबाद, चोपडा, सावदा, भुसावळ आणि जळगाव येथील 149 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल सायंकाळी प्राप्त झाले. त्यात 120 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 29 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यात गुरुवारी आणखी 29 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील भडगाव, नशिराबाद, चोपडा, सावदा, भुसावळ आणि जळगाव येथील 149 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल सायंकाळी प्राप्त झाले. त्यात 120 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 29 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भडगावचे चार, चोपडा, सावदा, भुसावळ, उमाळा, विटनेर येथील प्रत्येकी एक, तर जळगाव शहरातील जाखनीनगर, तांबापुरा, सलगार नगर व इतर भागातील 20 व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 557 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
रुग्ण संख्येत झपाट्याने होतेय वाढ-
जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 64 बळी गेले आहेत. कोरोनाचा मृत्यूदर देखील कमी होत नसल्याने जळगावकरांची चिंता वाढली आहे.