जळगाव- जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात तब्बल 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 257 वर पोहोचली आहे.
जळगावात एकाच दिवसात आढळले 20 कोरोना पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 257 वर
देशासह राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. चाचण्या वाढवण्यात आल्याने बाधित रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. दरम्यान, शनिवारी जळगाव जिल्ह्यात २० कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव, पारोळा व चोपडा येथे स्वॅब घेतलेल्या 127 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल शनिवारी प्राप्त झाले आहे. यापैकी 107 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून वीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 257 इतकी झाली असून त्यापैकी 45 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत. तर तीस कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे,अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण रुग्ण - 257
अमळनेर - 105 (कोरोनामुक्त 27)
भुसावळ - 52 (कोरोनामुक्त 9)
जळगाव - 54 (6 कोरोनामुक्त)
पाचोरा - 20 (3 कोरोनामुक्त)
चोपडा - 14 (शहर 9, अडावद 5)
मलकापूर 1
यावल 2 (फैजपूर 2 )
भडगाव 8 (शहर 6, 2 निंभोरा)
खामगाव 1
देशासह राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. चाचण्या वाढवण्यात आल्याने बाधित रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. आज तिसरा लॉकडाऊन आज संपत आहे. नागरिकांनी घरातच राहून लॉकडाऊनचे नियम पाळावेत आणि प्रशासनाला सहकार्य करावे.