जळगाव -कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी राज्य सरकारने मार्च महिन्यापासून कडक निर्बंध लादले आहेत. त्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय ठप्प आहेत. गेल्या अडीच महिन्यांपासून व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. किमान आता तरी आम्हाला व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करत आज (सोमवारी) जळगाव शहरातील विविध मार्केटच्या व्यापाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली.
शहरातील अजिंठा शासकीय विश्रामगृहात व्यापाऱ्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. जळगाव जिल्ह्यात आता कोरोनाची दुसरी लाट काहीअंशी ओसरली आहे. रुग्णसंख्या कमी होत असून, परिस्थिती नियंत्रणात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने नव्याने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये झाला आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन शहरासह जिल्ह्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करून अत्यावश्यक सेवेप्रमाणे इतर व्यापाराला देखील परवानगी देण्यात आली पाहिजे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली.
अन्यथा व्यापाऱ्यांवर आत्महत्येची वेळ -