जळगाव -जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच आहे. सोमवारी या संख्येने साडेचारशेचा टप्पा ओलांडला. जिल्ह्यातील सद्यस्थितीत 459 इतके कोरोनाबाधित रुग्ण आहेत. जळगावसह भुसावळ शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. दोन्ही शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येने शतक पूर्ण केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पोहचली 459 वर!
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 459 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 195 रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहे, तर जिल्ह्यातील 54 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील भुसावळ व चोपडा येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींपैकी 55 व्यक्तींचे तपासणी अहवाल जिल्हा प्रशासनाला सोमवारी रात्री प्राप्त झाले असून, त्यापैकी 50 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 4 व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एका व्यक्तीचा पुनर्तपासणी अहवालही पाॅझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये चोपडा येथील 3 तर भुसावळ शहरातील एका व्यक्तीचा आहे.
कोरोनाच्या बळींची संख्याही वाढतीच-
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 459 इतकी झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 195 रूग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहे, तर जिल्ह्यातील 54 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर कमी होत नसल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढतच चालली आहे. जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि बोदवड हे दोन तालुके वगळता इतर सर्वच तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
कोरोना अपडेट्स-
भुसावळ- 119
जळगाव- 114
अमळनेर- 110
भडगाव- 47
चोपडा- 23
पाचोरा- 23
धरणगाव- 10
यावल- 11
रावेर- 4
जामनेर- 3
एरंडोल- 3
पारोळा- 1
चाळीसगाव- 1
मलकापूर- 1