महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 19 हजार 983 अर्ज वैध - राजकीय रणधुमाळी

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीला आता रंगत येऊ लागली आहे. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत २८८ उमेदवारांचे अवैध ठरले आहेत. आता अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

asd
ग्रामपंचायत निवडणूक

By

Published : Jan 2, 2021, 9:35 AM IST

Updated : Jan 2, 2021, 9:43 AM IST

जळगाव- जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. यात प्रक्रियेत छाननीनंतर 19 हजार 983 अर्ज वैध ठरले तर 288 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. आता माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतींमध्ये कोण माघार घेतो, कोण रिंगणात राहतो? याकडे लक्ष लागले आहे.

जळगाव जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींमधील 2 हजार 670 प्रभागांमध्ये 7 हजार 213 ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडीसाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीसाठी 30 डिसेंबर अखेर 20 हजार 271 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेत 19 हजार 983 उमेदवारी अर्ज वैध ठरले. तर 288 उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. दरम्यान, माघारीसाठी उमेदवारांना 4 जानेवारीची मुदत असून, त्यानंतर चिन्ह वाटप होईल.

जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 19 हजार 983 अर्ज वैध
'त्या' तृतीयपंथीचा उमेदवारी अर्ज अवैधच-जळगाव तालुक्यातील भादली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी एका तृतीयपंथीने सर्वसाधारण महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तो अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाद ठरवला आहे. निवडणूक आयोगाच्या परिपत्रकाचा आधार घेऊन हा निर्णय देण्यात आल्याची माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली आहे. तृतीयपंथी अंजली पाटील यांनी सर्वसाधारण महिला प्रवर्गातून अर्ज दाखल केला, परंतु, मतदार यादीत त्यांच्या लिंगाचा उल्लेख हा 'इतर' म्हणून असल्याने त्यांना सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवारी दाखल करता येणार नाही, असेही नामदेव पाटील यांनी सांगितले. दरम्यान, जळगाव तालुक्यातील 43 ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे, यासाठी 1 हजार 545 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत त्यापैकी 15 अर्ज बाद झाल्याने 1 हजार 1530 उमेदवारी अर्ज वैध ठरले. आता माघारी व त्यानंतर चिन्ह वाटप होईल, असेही तहसीलदार पाटील म्हणाले.

तालुकानिहाय अशी आहे वैध उमेदवारी अर्जांची संख्या-

जळगाव 1530
जामनेर 2024
धरणगाव 1121
एरंडोल 839
पारोळा 1458
भुसावळ 844
मुक्ताईनगर 1145
बोदवड 610
यावल 1219
रावेर 1153
अमळनेर 1348
चोपडा 1321
पाचोरा 2322
भडगाव 943
चाळीसगाव 2106

Last Updated : Jan 2, 2021, 9:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details