जळगाव -जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढतच चालला आहे. आज (मंगळवारी) देखील तब्बल 368 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 1 हजार 566 वर गेली आहे. चिंतेची बाब म्हणजे, मंगळवारी 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. समाधानाची बाब म्हणजे, मंगळवारी जिल्ह्यातील 101 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी रात्री प्राप्त झालेल्या आकडेवारीत 368 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले. त्यात सर्वाधिक 164 रुग्ण हे सद्यस्थितीत जिल्ह्यातील कोरोनाचे प्रमुख हॉटस्पॉट असलेल्या एकट्या जळगाव शहरातील आहेत. त्याचप्रमाणे, चाळीसगाव तालुक्यात 55, जळगाव ग्रामीणमध्ये 34, चोपडा तालुक्यात 28, मुक्ताईनगर तालुक्यात 23, भुसावळ तालुक्यात 23 असे रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी मृत्यू झालेल्यांमध्ये भुसावळ तालुक्यातील 70 वर्षीय आणि चोपडा तालुक्यातील 73 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या एकूण बळींची संख्या 1377 इतकी झाली आहे.
अॅक्टिव्ह रुग्ण मोठ्या संख्येने वाढताहेत-