जळगाव : जळगाव महानगरपालिकेतर्फे ( Jalgaon Municipal Corporation ) कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील जळगावतील रस्त्यांची चाळणी ( Dilapidated Condition of Roads ) झाली आहे. यामुळे नागरिकांचे पाठीच्या आजाराला वाहनधारकांना सामोरे जावे लागत आहे. तर वाहनांचीही मोठे नुकसान होत आहे. मात्र, महानगरपालिकेतर्फे कुठलीही उपाययोजना करण्यात येत नसून, स्वतः जळगावातील नागरिकांकडून आपल्या स्वखर्चाने स्वतःच्या घरासमोरील रस्ता काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात केली आहे. तर शहरातील इतर नागरिकांनाही वर्गणी गोळा करून आपापल्या गल्लीबोळातील रस्ते कॉंक्रिटीकरण करून घ्यावे, असे मतदेखील व्यक्त करण्यात आले.
42 कोटी खर्चूनही रस्त्यांची दैना अवस्था :जळगाव शहरात रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून जळगावतील रस्त्यांसाठी तब्बल 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र, अनेक महिने उलटूनदेखील रस्त्यांची अद्याप दैना अवस्था पाहावयास मिळते. यामुळे या रस्त्याच्या अवस्थेला कंटाळून नागरिकांनी स्वतः वर्गणी करून आपल्या घरासमोरील रस्ते कॉंक्रिटीकरण करून घेण्यास जळगाव आज सुरुवात केली आहे.
स्वखर्चातून उभारले रस्ते :जळगाव शहरातील गणपती नगरात रस्ता दुरुस्ती करण्यासंदर्भात नगरसेवकांकडे तक्रार करण्यात आली. मात्र, या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. यामुळे यशवंत बारी यासाठी पुढे सरसावले. त्यांनी स्वखर्चाने आपल्या गल्लीत होणाऱ्या नागरिकांना त्रासापासून बचाव व्हावा याकरिता पुढाकार घेऊन सर्व गल्लीच्या नागरिकांच्या सहकार्याने वर्गणी जमा करून काँक्रीटचा रस्ता तयार केला. हा रस्ता तयार केल्याने परिसरात सकारात्मक चर्चा होत असून, पालिकेच्या निष्क्रियपणाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
जळगावकरांनी स्वखर्चाने करून घ्यावे आपल्या घरासमोरील रस्ते :शहरातील गणपती नगरात एक दोन नव्हे तीन नगरसेवक आहेत. हायवेपासून गणपती मंदिरापर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा नगरसेवकांकडे केली. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या खराब रस्त्यामुळे रहिवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. यामुळे आता गल्लीतूनच पैसे जमा करून आपला स्वतःच रस्ता काँक्रिटीकरण करण्याचा निर्धार नागरिकांनी घेतला आणि तो पूर्णही केला.