महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर दगडफेक; एक कर्मचारी जखमी - जळगाव महापालिका अतिक्रमण दगडफेक

जळगाव शहरातील बळीराम पेठ, सुभाष चौक, राजकमल चौक व शिवाजी रोड भागात अनधिकृत हॉकर्सला व्यवसाय करण्यास बंदी घालून, नोंदणीकृत हॉकर्सला गोलाणी मार्केटमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार २०० हॉकर्सची सोडत देखील काढण्यात आली आहे.

jalgaon incident
जळगावात महापालिकेच्या अतिक्रमण पथकावर दगडफेक

By

Published : May 27, 2020, 6:04 PM IST

जळगाव -अनधिकृतपणे व्यवसाय करत असलेल्या हॉकर्सवर कारवाईसाठी गेलेल्या मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाच्या पथकावर ४० ते ५० जणांनी दगडफेक केली. हा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडला. या हल्ल्यात मनपा कर्मचारी दीपक कोळी जखमी झाले आहेत. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील बळीराम पेठ, सुभाष चौक, राजकमल चौक व शिवाजी रोड भागात अनधिकृत हॉकर्सला व्यवसाय करण्यास बंदी घालून, नोंदणीकृत हॉकर्सला गोलाणी मार्केटमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार २०० हॉकर्सची सोडत देखील काढण्यात आली आहे. मात्र, मनपाच्या सूचना देवूनही या भागात व्यवसाय करत असलेल्या अतिक्रमणधारकांवर मनपाच्या पथकाने बुधवारी कारवाई केली. सकाळी ११ वाजता राजकमल चौक परिसरात कारवाई सुरु असताना काही व्यावसायिकांनी मनपा पथकातील कर्मचाऱ्यांना विरोध केला. तसेच शाब्दिक वाद देखील घातला.

हॉकर्स व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये कारवाईवरून वाद सुरू असतानाच मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी घटनास्थळी येवून हॉकर्सची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तसेच ज्या हॉकर्सला गोलाणी मार्केटमधील ओटे देण्यात आले आहेत, त्या ठिकाणी व्यवसाय करण्याची सूचना केली. मात्र, हॉकर्सने त्यांची मागणी अमान्य करत, जप्त केलेला माल परत करण्याची मागणी केली. त्यानंतर वाद वाढतच जात असल्याने उपायुक्तांनी पोलिसांशी संपर्क साधला. तसेच अतिरिक्त कुमक पाठविण्याची मागणी केली.

४० ते ५० जणांकडून दगडफेक -

मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला पूर्वनियोजित होता. हॉकर्सची समजूत घातल्यानंतर पोलीस स्टेशन गाठल्यानंतर मनपाच्या पथकावर दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती वाहुळे यांनी दिली. मनपा कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राजकमल चौकात कारवाई सुरु असतानाच जोशीपेठ भागातून ४० ते ५० जण आले व त्यांनी मनपा कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. मनपा कर्मचारी बचाव करत दुकानांच्या मागे लपले. दगडफेकीत मनपा कर्मचारी दीपक कोळी जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला वीट लागली. तसेच काही युवकांनी मनपाच्या ट्रॅक्टरवर देखील दगडफेक केली असल्याचे मनपा कर्मचाऱ्यांनी सांगितले.

गोलाणी मार्केटमध्ये बसण्यास नकार -

बुधवारी मनपाकडून झालेल्या कारवाईत काही नोंदणीकृत हॉकर्स होते. तर काही अनधिकृत हॉकर्सचाही समावेश होता. ज्या नोंदणीकृत हॉकर्सवर कारवाई झाली, त्यांना मनपाने गोलाणी मार्केटमधील ओट्यांवर व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, संबंधित हॉकर्सकडून गोलाणीत व्यवसाय करण्यास नकार दिला आहे. तर अनधिकृत हॉकर्सला तर व्यवसाय करण्याची परवानगी नसल्याने त्यांच्यावर मनपाने कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details