महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; भीषण अपघातात तीन तरुण ठार - three death in accident

अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील तीन तरुण ठार झाले.

accident death
अपघातात तीन तरुण ठार

By

Published : May 25, 2021, 8:55 PM IST

Updated : May 25, 2021, 9:24 PM IST

जळगाव -अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरील तीन तरुण ठार झाले. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील फुलगाव फाट्याजवळ असलेल्या उड्डाणपुलावर घडली. दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला.

माहिती देताना सहायक पोलीस निरीक्षक संदीप बोरसे

हेही वाचा -'या' १८ जिल्ह्यांत होम आयसोलेशन पूर्णपणे बंद, म्यूकरमायकोसिससाठी 30 कोटींची तरतूद

विवेक सुनील पाटील (वय १७), देवानंद सोपान पाटील (वय १६) आणि तुषार राजेंद्र पाटील (वय १७) अशी या भीषण अपघातात ठार झालेल्या तिन्ही तरुणांची नावे आहेत. हे तिघे जण भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील रहिवासी होते.

एकाचा घटनास्थळी तर दोघांचा रुग्णालयात झाला मृत्यू-

विवेक, देवानंद आणि तुषार हे तिघे मित्र मंगळवारी सकाळी कामानिमित्त भुसावळला आलेले होते. भुसावळातील काम आटोपल्यानंतर ते (एमएच १९ यू ७८६३) क्रमांकाच्या दुचाकीने घरी तळवेलला परत जात होते. महामार्गावर फुलगाव फाट्याजवळ असलेल्या उड्डाणपुलावर त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात तिघे दुचाकीवरून रस्त्यावर फेकले गेले. यात तिघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. विवेकाचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेले देवानंद व तुषार या दोघांना गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले होते. परंतु, त्यांचा रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

तळवेल गावावर एकच शोककळा-

या घटनेमुळे तळवेल गावावर एकच शोककळा पसरली आहे. गावातील तीन तरुण अपघातात ठार झाल्याने गावात एकही चूल पेटली नाही. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांचे राज ठाकरेंकडून सांत्वन

Last Updated : May 25, 2021, 9:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details