महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात; पोलीस अधीक्षकांकडून गुलाबपुष्प देऊन सत्कार - police corona positive

पोलीस दलातील 3 कर्मचाऱ्यांना मालेगाव येथे बंदोबस्तावर असताना कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने, या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आज (बुधवार) पोलीस अधीक्षक कार्यालयात त्या तिघा पोलिसांचा, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

Three police personnals in jalgao beat corona were falicitated by SP
पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात; पोलीस अधीक्षकांकडून गुलाबपुष्प देऊन सत्कार

By

Published : May 20, 2020, 8:35 PM IST

जळगाव- जिल्हा पोलीस दलातील 3 कर्मचाऱ्यांना मालेगाव येथे बंदोबस्तावर असताना कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने, या तीनही पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आज (बुधवार) पोलीस अधीक्षक कार्यालयात त्या तिघा पोलिसांचा, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे मागील पंधरवड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत होता. त्यामुळे तेथील परिस्थिती हाताबाहेर जाऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती होती. या अनुषंगाने नाशिक परिक्षेत्राच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातून 100 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्ताच्या कामासाठी मालेगाव येथे गेलेले होते.

बंदोबस्ताचे काम करत असताना त्यातील 3 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. ही बाब समोर आल्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर वेळीच उपचार झाल्याने तिघे कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. याच अनुषंगाने पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे, इतर पोलिसांसाठी देखील सकारात्मक संदेश जावा, या उद्देशाने तीनही पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात सन्मानित करण्यात आले.

यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी तीनही पोलीस कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले. तसेच त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

कोरोनाची लागण झाल्यानंतर देखील मानसिकरित्या खचलो नाही, सकारात्मक विचार केला, त्याचप्रमाणे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे आम्ही कोरोनावर मात करू शकलो, अशी भावना कोरोनावर मात केलेल्या पोलिसांनी व्यक्त केली.

हेही वाचा -मालेगावला बंदोबस्तावर गेलेल्या जळगावातील 2 पोलिसांना कोरोनाची लागण; दोघे 93 जणांच्या संपर्कात

हेही वाचा -बनावट ओळखपत्र बनवून कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रवेश; 15 जणांवर फसवणुकीचा गुन्हा

ABOUT THE AUTHOR

...view details