महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चोरीच्या वस्तू विक्रीसाठी नेणाऱ्या तिघांना अटक - जळगाव घरफोडी न्यूज

२४ सप्टेंबरला जळगाव शहरातील एका बंद घराचे दरवाजे आणि काही लोखंडी साहित्याची चोरी झाली होती. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

Criminals
आरोपी

By

Published : Sep 26, 2020, 12:17 PM IST

जळगाव -शहरातील धनाजीकाळे नगरातील बंद घरात चोरी झाल्याची घटना २४ सप्टेंबरला घडली. या घरफोडीत चोरट्यांनी घराला लावलेले तीन लोखंडी दरवाजे, बाथरुमचा दरवाजा व पाईप लंपास केले. या गुन्हेगारांना शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

राजेश डिगंबर सोनवणे यांचे धनाजी काळे नगरमध्ये घर आहे. याठिकाणी कोणीच राहत नसल्याने ते घर बंदच होते. चोरट्यांनी घर बंद असल्याची संधी साधत घरफोडी केली. चोरट्यांनी घराला लावलेले तीन लोखंडी दरवाजे, बाथरुमचे स्लाईडींगचे दरवाजे, बोअरींगचे पाईप व मोटार, इलेक्ट्रॉनिक्स बोर्ड व वायर, इलेक्ट्रॉनिक्सच वजन काटा, भांडे ठेवण्याचे रॅक व इतर लोखंडी साहित्य लंपास केले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चोरट्यांनी चोरलेले लोखंडी दरवाजे

चोरीचा माल विक्रीस नेताना केली अटक -

चोरट्यांनी घरफोडी केल्यानंतर चोरुन नेलेले साहित्य गेंदालाल मिल कॉम्प्लेक्समध्ये लपवून ठेवले होते. हे साहित्य विक्री करण्यासाठी ते मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घेवून जात असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांना मिळाली. तत्काळ वासुदेव सोनवणे, विजय निकुंभ, गणेश पाटील, रतन गिते, भास्कर ठाकरे, अक्रम शेख, योगेश इंधाटे, तेजस मराठे यांच्या पथकाने घरफोडीतील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.

घरफोडीतील गुन्हेगार -

घरफोडीच्या प्रकरणात अजित रशिद पठाण (३२), शंकर विश्वनाथ साबणे (१८), हकिम मोहम्मद नूर शहा (२०) सर्व राहणार गेंदालाल मिल या तिघांना पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. हे तिघे सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details