महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 18, 2020, 9:00 AM IST

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात दोन घटनांमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू

सायंकाळी काम आटोपून घरी परतत असताना विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे, तिघेही युवक लिंबाच्या झाडाखाली उभे राहिले. यावेळी अचानक अंगावर वीज पडल्याने महेंद्र पवार व रवींद्र महाजन हे दोन्ही युवक जागीच ठार झाले, तर जगदीश पवार हा जखमी झाला.

वीज पडून मृत्यू
वीज पडून मृत्यू

जळगाव- जिल्ह्यात काल (१७ सप्टेंबर) सायंकाळी दोन विविध घटनांमध्ये वीज पडून तिघांचा मृत्यू झाला. त्यात एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे शेतात घडलेल्या घटनेत दोघांचा, तर चोपडा शहरातील घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे.

एरंडोल तालुक्यातील आडगाव येथे काल सायंकाळी वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. महेंद्र उखर्डू पवार (वय २३) व रवींद्र प्रभाकर महाजन (वय २२) अशी मृतांची नावे आहेत. दोघे आडगाव येथील रहिवासी होते. आडगाव येथील उखर्डू पवार यांचे डोली शिवारात शेत आहे. या शेतात त्यांची मुले महेंद्र पवार, जगदीश पवार आणि त्यांचा मित्र रवींद्र महाजन हे कापूस वेचण्यासाठी गेलेले होते. सायंकाळी काम आटोपून घरी परतत असताना विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. त्यामुळे, तिघे युवक लिंबाच्या झाडाखाली उभे राहिले. यावेळी अचानक अंगावर वीज पडल्याने महेंद्र पवार व रवींद्र महाजन हे दोन्ही युवक जागीच ठार झाले, तर जगदीश पवार हा जखमी झाला. या घटनेमुळे आडगावात एकच शोककळा पसरली आहे.

दुसरी घटना चोपडा शहरात घडली आहे. चोपडा नगरपरिषदेतील पाणीपुरवठा विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणारे दीपक पारधी यांचा देखील वीज पडून मृत्यू झाला. दीपक पारधी काल सायंकाळच्या सुमारास चोपडा शहरातील रामपुरा भागात कंपोस्ट डेपोमध्ये पाईपलाईनचे काम करत होते. त्यावेळी अचानक त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा-चाळीसगाव गांजा अन् गुटख्याचे हब, आमदार मंगेश चव्हाण यांचा आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details