जळगाव -जिल्ह्यात कोरोना पुन्हा एकदा आपले हातपाय पसरत असल्याची स्थिती आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात तब्बल 321 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. गुरुवारी 169, तर शुक्रवारी 152 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांमध्ये हलगर्जीपणा वाढला -
जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 321 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले आहेत. समाधानाची बाब म्हणजे 94 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला होता. त्यानंतर मात्र, नागरिकांमध्ये हलगर्जीपणा वाढला. मास्कचा वापर करणे नागरिक टाळत होते. त्याचप्रमाणे बाजारपेठेत उसळलेली गर्दी, लग्नसराई, राजकीय सभा व मेळाव्यांमध्ये होणारी अनियंत्रित गर्दी यासारख्या कारणांमुळे कोरोना पुन्हा एकदा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज नव्याने समोर आलेल्या 152 रुग्णांमध्ये 95 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणीतून, तर 57 रुग्ण रॅपिड अँटीजन चाचणीतून समोर आले आहेत.
जळगाव शहराची वाटचाल 'हॉटस्पॉट'कडे -