महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगाव जिल्ह्यात 38 कोरोना बाधितांची भर; एकूण रुग्णसंख्या 800 वर - jalgaon corona latest news

भुसावळ शहरात मंगळवारी नव्याने 18 रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या 190 झाली आहे. सद्यस्थितीत भुसावळ शहर हे जिल्ह्यातील सर्वाधिक संवेदनशील शहर बनले आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीत भुसावळ पाठोपाठ जळगाव 175 रुग्णांसह दुसऱ्या तर अमळनेर शहर 136 रुग्णांसह तिसऱ्या क्रमांकाचे संवेदनशील शहर ठरले आहे.

जळगाव जिल्ह्यात 38 कोरोना बाधितांची भर
जळगाव जिल्ह्यात 38 कोरोना बाधितांची भर

By

Published : Jun 2, 2020, 7:12 PM IST

जळगाव - जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक वेगाने वाढतच आहे. जिल्हा प्रशासनाला मंगळवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या पहिल्या टप्प्यातील अहवालांमध्ये तब्बल 38 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 800 वर पोहचली आहे. मंगळवारी एकट्या भुसावळ शहरात सर्वाधिक 18 नवे रुग्ण आढळले. त्याचप्रमाणे रावेर शहरात देखील 10 रुग्णांची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.

भुसावळ शहरात मंगळवारी नव्याने 18 रुग्ण आढळल्याने येथील रुग्णसंख्या 190 झाली आहे. सद्यस्थितीत भुसावळ शहर हे जिल्ह्यातील सर्वाधिक संवेदनशील शहर बनले आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीत भुसावळ पाठोपाठ जळगाव 175 रुग्णांसह दुसऱ्या तर अमळनेर शहर 136 रुग्णांसह तिसऱ्या क्रमांकाचे संवेदनशील शहर ठरले आहे. भडगाव आणि रावेरात देखील कोरोना आपले हातपाय पसरवत आहे. मंगळवारी पहिल्या टप्प्यातच जिल्हा प्रशासनाला 38 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात जळगाव शहर 3, भुसावळ 18, चोपडा 1, भडगाव 1, एरंडोल 1, जामनेर 1, जळगाव ग्रामीण 1, रावेर 10 आणि मुक्ताईनगरात 2 असे एकूण 38 रुग्ण नव्याने आढळले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी बोदवड वगळता सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आतापर्यंत मुक्ताईनगरात देखील कोरोनाचा शिरकाव झालेला नव्हता. मात्र, मंगळवारी याठिकाणी 2 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जिल्हा परिषदेच्या सभापतींसह त्यांच्या पुत्रास कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना अपडेट्स -

जळगाव शहर - 175
भुसावळ - 190
अमळनेर - 136
चोपडा - 40
पाचोरा - 27
भडगाव - 78
धरणगाव - 17
यावल - 26
एरंडोल - 14
जामनेर - 12
जळगाव ग्रामीण - 25
रावेर - 43
पारोळा - 6
चाळीसगाव - 7
मुक्ताईनगर - 2
इतर जिल्ह्यातील - 2
एकूण - 800

ABOUT THE AUTHOR

...view details