महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावात लग्नातून १६ लाखांचे दागिने लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

भुसावळ रोडवरील हॉटेल कमल पॅरेडाईस येथे लग्न समारंभातून अज्ञात चोरट्यांनी नवरीचे सोन्याचे दागिने व अडीच लाख रुपये रोकड, असा एकूण सुमारे १६ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरट्यांनी अवघ्या १५ मिनीटात हा मुद्देमाल लंपास केला.

Shanipeth Police Thane
शनीपेठ पोलीस ठाणे

By

Published : Feb 16, 2021, 5:02 PM IST

जळगाव - भुसावळ रोडवरील हॉटेल कमल पॅरेडाईस येथे लग्न समारंभातून अज्ञात चोरट्यांनी नवरीचे सोन्याचे दागिने व अडीच लाख रुपये रोकड, असा एकूण सुमारे १६ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरट्यांनी अवघ्या १५ मिनीटात हा मुद्देमाल लंपास केला. ही घटना काल दुपारी उघडकीस आली. चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

हेही वाचा -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: येणाऱ्या काळात 'दूध का दूध, पाणी का पाणी होईल' - गुलाबराव पाटील

अधिक माहिती अशी की, युवराज विश्वनाथ नेमाडे (वय ५३ रा. बाविसे गल्ली, रावेर) यांच्या मुलीचे लग्न जळगाव-भुसावळ रोडवरील हॉटेल कमल परेडाईस येथे काल (१५ फेब्रुवारी) आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्ताने ते त्यांच्या नातेवाईकांसह आणि कुटुंबासह लग्नाला आलेले होते. दरम्यान, दुपारी १.४३ ते २ वाजेच्या दरम्यान अज्ञात एक व्यक्ती आणि दोन लहान मुलांनी लग्न समारंभात वऱ्हाडी व्यस्त असताना पिशवीतून अडीच लाख रुपयांची रोकड, १ लाख रुपये किंमतीच्या दोन तोळ्याच्या सोन्याच्या दोन चैन, ५५ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, ५५ हजार रुपये किंमतीची १ तोळ्याची सोन्याची चैन, ४ लाख रुपये किंमतीचा सोन्याचा हार सेट, त्यात कानातील रिंग, अंगठी, ब्रेसलेट, ४२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, ४ लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या, ७० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे झुमके, ४२ हजार रुपये किंमतीची सोन्याची बिंदी, ४२ हजार रुपये किंमतीचे ८ ग्रॅम वजनाचे कानातील लोमटे, १ लाख १२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मोराचे पेंडल, असा एकूण १६ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केला.

सीसीटीव्हीत चोरटे कैद

हॉटेल कमल पॅरेडाईस हे सुसज्जित असे हॉटेल असून लग्नाच्या हॉलमध्ये चोहीबाजूने सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. चोरटे या सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. यात एक अनोळखी व्यक्ती आणि त्याच्यासोबत दोन लहान मुले असल्याचे दिसून आले आहे.

अज्ञात तिघांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

युवराज नेमाडे यांनी तत्काळ काल सायंकाळी १० वाजता शनीपेठ पोलिसात धाव घेवून घटनेची माहिती दिली. या प्रकरणी नेमाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी धाव घेवून घटनेची माहिती जाणून घेतली. सीसीटीव्हीत कैद झालेल्या तीन जणांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा -जळगावात लग्नात नाचण्यावरून तरुणावर चॉपर हल्ला, दोघांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details