जळगाव-राज्यात दरोडेखोरांना पकडायला वेळ नाहीये. बलात्काऱ्यांना पकडायला वेळ नाहीये. सट्टा- पत्ता, दारू, सर्व अवैध धंदे सुरू आहेत. मात्र, या सरकारला नारायण राणे यांच्या घरी जाऊन नोटीस द्यायला वेळ ( Kankavli Police Notice To Narayan Rane ) आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आम्ही नारायण राणे यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे असल्याचे, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना ( Devendra Fadnvis On Narayan Rane Notice ) सांगितले. अवैध धंद्यांबाबत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका ( Devendra Fadnavis Criticized MVA Government ) केली. चाळीसगावात अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनावरण सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस आले होते. सोहळ्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शिवाजी महाराजांच्या विचारांमुळे महाराष्ट्राची ओळख दिल्लीत व इतिहासात वेगळी आहे. परंतु सद्या महाराजांच्या राज्यात मराठा, ओबीसी व इतर आरक्षणासाठी आपण आपआपसात भांडत आहोत. या प्रश्नांमुळे दिल्लीत खासदारांंमध्ये एक वेगळीच चर्चा सुरु असून, सद्या महाराष्ट्रात काय चालू आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी. पण सद्या गरज आहे ती महाराष्ट्र ओळख जपण्याची. त्यासाठी राज्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येवून आरक्षणाचा मुद्दा सोडविला पाहिजे, असे आवाहन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती ( MP Yuvraj Sambhajiraje Chhatrapati ) यांनी केले. चाळीसगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचा अनावरण सोहळा बुधवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीष महाजन, खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, राजूमामा भोळे, संजय सावककारे, चंदूभाई पटेल, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्षज लालचंद पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्यासह चाळीसगाव नगर पालिकेचे नगरसेवक व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी राजांचे पुतळे व स्मारक बांधून चालणार नाही, तर त्यांचे विचार लिखीत स्वरुपात सर्वांपर्यंत पोहचले पाहिजे, गड्ड किल्ल्यांच्या सर्वधनासाठी मोठ्या प्रमाणात निधी उभा करण्याची गरज आहे. तरच भविष्यात या जिवंत किल्ल्यांचे जतन होईल.
तरुणाईने धरला डीजेच्या तालावर ठेका