जळगाव -शहर पोलीस ठाण्याच्या मागील बाजूला असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी व्यापारी संकुलातील पानमसाल्याची दोन दुकाने मंगळवारी रात्री चोरट्यांनीफोडून हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे.
जळगाव शहर पोलीस ठाण्याजवळच चोरी; पानमसाल्याची दोन दुकाने फोडली - जळगाव गुन्हे वार्ता
मंगळवारी रात्री चोरट्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी व्यापारी संकुलातील पानमसाल्याची दोन दुकाने फोडून हजारो रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीस ठाण्यापासून जवळच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी व्यापारी संकूल आहे. या व्यापारी संकुलात रवींद्र सुकलाल वाणी यांचे (दुकान क्रमांक २९) विजय पान मंदिर नावाचे दुकान आहे. तर, जवळच रमेश सपकाळे यांचे जय बजरंग नावाने पान मसाल्याचे दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता दोघे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दोन्ही दुकानांचे कुलूप तोडून चोरी केली. चोरट्यांनी रवींद्र वाणी यांच्या दुकानातून ७०० रुपयांची सिगारेटची पाकिटे, २०० रुपयांची चिल्लर आणि टेबल फॅन असा २५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. तसेच रमेश सपकाळे यांच्या दुकानातून चॉकलेटची बरणी आणि चिल्लर असा ऐवज लंपास केला.