जळगाव - शहरात सुरू असलेल्या चोऱ्यांचे सत्र अद्याप सुरूच आहे. चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री शहरातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याजवळचे मेडीकल दुकान फोडले. या दुकानातून १ लाख ३३ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली आहे. आज (मंगळवारी) सकाळी ८ वाजता ही घटना उघडकीस आली.
जळगावात पोलीस ठाण्यासमोरच चोरी; मेडीकल दुकान फोडून सव्वा लाखांची रोकड लंपास - भास्कर मार्केट
जळगावात पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मेडीकल दुकान चोरट्यांनी फोडले. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली असून या दुकानातून १ लाख ३३ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली.

जळगावात पोलीस ठाण्यासमोरच चोरी; मेडिकल दुकान फोडून सव्वा लाखांची रोकड लंपास
सीसीटीव्ही फुटेज नसल्यामुळे तपासात अडचण -
नाहटा रुग्णालयाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परंतु, व्यास यांच्या मेडिकल दुकानाच्या बाजुने कॅमेरा नसल्यामुळे त्यात चोरी होतानाचे चित्रीकरण झाले नाही. दरम्यान, हे मेडिकल दुकान पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आणि मुख्य रस्त्यावर आहे. या मार्गावर अनेक रुग्णालय असल्यामुळे रात्रभर नागरिकांची वर्दळ असते. अशा मुख्य रस्त्यावरील दुकानात चोरी झाल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.