महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळगावातील खड्डे बुजविण्याच्या कामाचा सोमवारी 'श्री गणेशा' - jalgaon road work news

शहरातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मनपा प्रशासनाकडून सर्व खड्डे बुजविण्यासाठी निविदा काढल्या असून सोमवारपासून खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली.

the work of filling the pits on the jalgaon road started monday
जळगावातील खड्डे बुजविण्याच्या कामाचा सोमवारी 'श्री गणेशा'

By

Published : Nov 19, 2020, 3:07 PM IST

जळगाव - शहरातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मनपा प्रशासनाकडून सर्व खड्डे बुजविण्यासाठी निविदा काढल्या असून सोमवारपासून खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली.

खड्डे बुजविण्याचा मक्ता घेणाऱ्या मक्तेदारांची गुरुवारी महापौर भारती सोनवणे यांनी मनपातील दालनात बैठक घेतली. बैठकीला नगरसेवक कैलास सोनवणे, भारत कोळी, धीरज सोनवणे, मनपा शहर अभियंता अरविंद भोसले आणि मक्तेदार उपस्थित होते.

खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास - महापौर
महापौरांनी सांगितले की, शहरातील खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. मनपा प्रशासनाकडून प्रत्येक प्रभागासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी. सुरुवातीला मुख्य, मोठे आणि त्या प्रभागातील रहदारीच्या रस्त्यावरील खड्डे बुजवावे, अशा सूचना महापौरांनी दिल्या. खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते तयार करण्याच्या कामाला देखील सुरुवात होईल, असेही त्या म्हणाल्या.

लोकप्रतिनिधी, नागरिकांनी लक्ष द्यावे
शहरातील खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रत्येक प्रभागात सुरुवात होणार आहे. आपापल्या प्रभागात होत असलेले काम योग्य पध्दतीने होते की नाही हे त्या परिसरातील नगरसेवक, लोकप्रतिनिधी व नागरिकांनी स्वतः उभे राहून तपासावे. संबंधित मक्तेदाराकडून योग्य काम करून घ्यावे असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details