जळगाव:हल्ला करणारे कोण, विनयभंग करणारे कोण या गुंड प्रवृत्तीच्या लोकांची चौकशी झाली पाहिजे व त्यांच्यावर कठोर कारवाई होऊन शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी असल्याचेही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. आ.चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलतांना खडसे म्हणाले, हा कसला शिवसेनेचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी त्याग केला राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. त्यामुळे चंद्रकांत पाटील आमदार झाला.
Khadse on Attack : हल्ल्याच्या मागे त्याच गुंड प्रवृत्तीचा हात - एकनाथ खडसे
दोन दिवसांपुर्वी मी ऑडियोक्लिप जारी (Audio clip released) केल्या. ते आणि हल्ला करणारे हे एकच असुन गुंड प्रवृत्तीचे लोक (People with hooligan tendencies) आहेत. महिलांवरील अन्याय कदापी सहन करणार नाही मी रोहिणी खडसे च्या पाठीशी भक्कमपणे उभा (Standing with Rohini Khadse) आहे हे सांगताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी हल्ल्या मागे आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांचाच हात असल्याचे पाटील यांचे नाव न घेता सांगितले.
एकनाथ खडसे
आणि काय स्वत: ला शिवसैनिक म्हणुन घेतो. अशी टिकाही खडसेंनी केली.चंद्रकांत पाटील निवडून आला. त्यावेळी भाजप सेनेची युती होती. या युतीशीही चंद्रकांत पाटलांने गद्दारी केली आणि निवडुन आला. आणि आता याच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना छळतोय असे म्हणत हल्ल्याच्या मागे आमदार चंद्रकांत पाटील यांचाच हात असल्याचे एकनाथराव खडसे यांनी आ. चंद्रकात पाटील यांचे नाव न घेता सांगितले.
Last Updated : Dec 28, 2021, 3:57 PM IST