जळगाव - सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे प्रशासनाने ( heat wave in Jalgaon ) नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. असे असतानाच जळगावात तापमानामुळे शेतकऱ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक ( farmer death due to sun stroke ) बाब समोर आली आहे. राज्यातील उष्माघाताने पहिला बळी गेला आहे. जितेंद्र संजय महाजन असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
33 वर्षाचे मृत शेतकरी जितेंद्र संजय महाजन हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडळ गावातील ( farmer death in Jalgaon ) रहिवासी होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार होता. मुलींची हालाखीची परिस्थितीतर दुसरीकडे दुष्काळ यावर ( death in sunstroke ) मात करीत ते प्रपंच चालवित होते. त्यांची पत्नी शितल ही सकाळी लवकर उठून ढोकळे तयार करून दररोज जितेंद्र खेड्यापाड्यांवर विकायला जात होती.
उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू हेही वाचा-Babanrao Lonikar Audio Clip : 'त्या' व्हायरल क्लीपबाबत लोणीकरांचे स्पष्टीकरण; म्हणाले, माझे वीज मीटर...
अमळनेर येथील रुग्णालयात हलविले-
सकाळी खमंग ढोकळा विक्री झाल्यावर दुपारपासून रात्रीपर्यंत शेतात कष्ट करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवित होता. खमंग विक्री करून जितेंद्र घरी आल्यावर त्यांना पुन्हा शेतात जायची घाई होती. जेवण न करता शेतात गेले. या शेतात काम करीत असतानाच भोवळ येऊन जमिनीवर कोसळले. दुसरीकडे मंगळवारचा उन्हाचा पारा 43.5 अंश असल्याने त्याचा फटका जितेंद्र यांना बसला. यावेळी त्यांनी चुलत भावाला चक्कर येत असल्याचे सांगितले. चुलत भावाने तात्काळ गावातील दवाखान्यात नेले. त्याची तब्येत जास्तच खालाविल्याने त्यांना तात्काळ अमळनेर येथील रुग्णालयात हलविण्याच्या सूचना खासगी डॉक्टरांनी दिल्या आहेत.
हेही वाचा-खासदार अरविंद सावंत यांनी संसदेत हे प्रश्न केले उपस्थित
शेतात आली भोवळ
उष्णतेचा फटका बसल्याने मृत्यू झाला. जितेंद्र माळी हे खमंग विक्री करून आपला उदरनिर्वाह भागवित होता. यानुसार परिसरातील गावांमध्ये खमंग विक्री करून ते दुपारी बाराच्या सुमारास घरी आले यानंतर शेतात जाऊन त्यांनी काम केले. सायंकाळी त्यांना शेतात भोवळ आली. चुलत भाऊ महेंद्र काशीनाथ माळी यांच्यासह सायंकाळी त्यांना शेतात भोवळ आली. त्यांचा चुलत भाऊ महेंद्र काशीनाथ माळी यांच्यासह शेतातील अन्य मजुरांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.
हेही वाचा-Jayant Patil : इस्रायलच्या महावाणिज्य दूतांना मंत्री जयंत पाटील म्हणाले, 'अशी ही बनवाबनवी' पहाच..
नातेवाईकांनी व्यक्त केला आक्रोश
येथील डॉक्टरांनी त्याच्यावर प्रथमोपचार करून जितेंद्रला अमळनेरला घेऊन जाण्याचे सुचविले. यानुसार अमळनेरला नेत असताना रस्त्यात बेशुद्ध पडले. ग्रामीण रुग्णालयात निघाल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष पाटील यांनी त्यांना मृत घोषित केले. या वेळेस नातेवाईकांनी आक्रोश केला. एकुलता एक मुलगा ही माझ्याकडून देवाने हिरावला असल्याचे दु:ख जितेंद्र यांच्या आईने व्यक्त केले.
शासनाच्या मदतीची अपेक्षा..
जितेंद्र महाजन यांच्या परिवारात पत्नी शितल,आई उषा,मुलगी दिव्या, मुलगा ओम असा परिवार आहे. मात्र, आता हा मोठा परिवार आम्ही कसा चालवावा? आम्हाला शासनाने आता मदत करावी अशी अपेक्षा जितेंद्र यांच्या पत्नी व्यक्त केली.
पालकमंत्र्यांकडून आश्वासन-
दुपारी दवाखान्यात जितेंद्र महाजन यांना आणल्यावर मृत झालेले होते. अति रक्तस्राव झाल्याचे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उन्हाचा फटका बसल्याने असे होऊ शकतो, असेही डॉक्टरांनी सांगितले. ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन करणारे डॉ. आशिष पाटील यांनी मृत शेतकऱ्यांमध्ये उष्माघात सदृश लक्षणे होती, मेंदूत रक्तस्राव झाल्याचे सांगितले. उष्माघाताने मृत्यू झाला असला तर याबाबत संबंधितांशी तात्काळ विचारणा करून प्रशासनातर्फे कुटुंबीयांना मदत जाहीर करतो असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.